Home क्राईम वॉटरग्रेस कंपनीच्या व्यवस्थापकाला धमकी; नगरसेवक कैलास सोनवणेंविरुध्द अदखलपात्र गुन्हा

वॉटरग्रेस कंपनीच्या व्यवस्थापकाला धमकी; नगरसेवक कैलास सोनवणेंविरुध्द अदखलपात्र गुन्हा

FIR

जळगाव प्रतिनिधी । वॉटरग्रेस कंपनीच्या व्यवस्थापकाला धमकी दिल्याप्रकरणी महापौर पती तथा नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याविरुध्द शनिवारी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, १४ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता मेहरुणमधील टी.बी. रुग्णालयाजवळ कैलास सोनवणे यांनी वॉटरग्रेस कंपनीचे व्यवस्थापक विशाल संतोष सकट (२२, रा.नाशिक, ह.मु.संभाजी नगर, जळगाव) यांना ‘ तु आमच्या कामात आडवा आला तर तुला जीवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली होती. विशाल सकट यांनी शनिवारी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली.


Protected Content

Play sound