नवी दिल्ली । निर्भया अत्याचार व खून प्रकरणात आज पहाटे फाशी झालेल्या चारही आरोपींच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम झाल्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात येणार आहे.
आप पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास निर्भया प्रकरणातील मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह या चारही आरोपींना फासावर लटकावण्यात आले. सुमारे अर्धा तासापर्यंत या चौघांना लटकावलेल्या अवस्थेत ठेवण्यात आले. यानंतर साडेसहा वाजेच्या सुमारास डॉक्टरांच्या पथकाने या चौघांना मृत घोषीत केले. यानंतर या चौघांचे मृतदेह दिनदयाल उपाध्याय रूग्णालयात पाठविण्यात येणार आहेत. येथे या चौघांच्या पार्थिवाचे पोस्टमार्टम होणार आहे. याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर या चौघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.