बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारले; कमलनाथ सरकारसमोर आव्हान

भोपाळ । मध्यप्रदेश विधानसभेचे सभापती एन.पी. प्रजापती यांनी रात्री उशीरा बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारल्यामुळे आज कमलनाथ सरकारला बहुमत सिध्द करण्यात अडचण येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कमलनाथ सरकारला शुक्रवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी काल रात्री बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारले. त्यामुळे आधीच अस्थिर झालेल्या कमलनाथ सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करणे अवघड जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक काही मंत्री आणि आमदारांनी पक्षाच्याविरोधात भूमिका घेत आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. मात्र विधानसभा अध्यक्षांनी हे राजीनामे स्वीकारले नव्हते. तथापि, काल रात्री बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहे. यामुळे काँग्रेसचे संख्याबळ घटले असून कमलनाथ सरकारसमोरील अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content