कोरोना : फाशी देण्यासाठी योग्य वेळ नाही ; निर्भयाच्या दोषींची नवी याचिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा व्हायरस धुमाकूळ घालत आहे. याच करोनाचा हवाला देत सध्या फाशी देण्यासाठी योग्य वेळ नसल्याची एक याचिका निर्भया सामूहिक बलात्काराच्या दोषींनी न्यायालयात दाखल केली आहे.

 

निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींकडून फाशी टाळण्यासाठी रोज नवनवीन प्रयत्न केले जात आहेत. दोषींनी दिल्लीतील पटियाला न्यायालयामध्ये अर्ज दाखल करत फाशी रोखण्याची मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या विचाराधीन असलेल्या याचिकांचा उल्लेख करत कोरोना व्हायरसचेही कारण सांगितले आहे. कोरोना देशभरात पसरत असून हा काळ फाशी देण्यासाठी योग्य नसल्याचे त्यांनी यामध्ये नमूद केले आहे. दरम्यान, दोषींना उद्या पहाटे फासावर लटकावले जाणार आहे.

Protected Content