रंजन गोगोई यांनी घेतली खासदारकीची शपथ ; विरोधीपक्षाचे ‘वॉक आऊट’ !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आज संसदेत राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेत असतांना विरोधी पक्षातील खासदारांनी मात्र, वॉक आऊट केले. दरम्यान, गोगोई सभागृहात येताच प्रचंड गोंधळ झाला होता.

 

रंजन गोगोई हे त्यांच्या पत्नीसमवेत राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी संसद भवनात दाखल झाल्यानंतर सभागृहाची कार्यवाही सुरू होताच गोगोई शपथ घेण्यासाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी पोहले. यावेळी विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरू केला. गोंधळातच गोगोई यांनी सभागृह सदस्य म्हणून शपथ घेतली. यानंतर विरोधी सदस्यांनी वॉक आऊट केले. दरम्यान, रंजन गोगोई यांना नुकतीच राष्ट्रपतींनी राज्यसभेचे सदस्य नियुक्तीविरोधात मधु पूर्णिमा किश्वर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तर आपण राज्यसभेचे सदस्यत्व का स्वीकारले? याबाबत आपली भूमिका लवकरच स्पष्ट करू असे गोगाई यांनी सांगितले आहे.

Protected Content