Home आरोग्य जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा संशयित रुग्ण दाखल

जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा संशयित रुग्ण दाखल


जळगाव (प्रतिनिधी) परदेशातून चार दिवसापूर्वी जळगावात परतलेल्या एक विद्यार्थी कोरोनाचा संशयित रुग्ण म्हणून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला आहे.

स्पेनमध्ये शिक्षणासाठी 22 वर्षीय विद्यार्थी गेलेला होता. साधारण चार दिवसांपूर्वी जळगावात आपल्या घरी परत आला होता. हा विद्यार्थी आज जिल्हा रुग्णालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःहुन संशयित म्हणून भरती झाला आहे, अशी माहिती जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहे. आत्तापर्यंत आजचा सोडून दोन संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे, त्याचे रिपोर्ट उद्यापर्यंत प्राप्त होणार असल्याचेही महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी सांगितले.


Protected Content

Play sound