निर्भया प्रकरण : तेव्हा मी दिल्लीत नव्हतोच ; आरोपी मुकेशचा कांगावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले होते. बलात्काराच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबर २०१२ रोजी मला दिल्लीत आणण्यात आले. निर्भयावर अत्याचार झाले त्यादिवशी मी दिल्लीत नव्हतोच, असे सांगत मुकेश सिंह याने आपल्या फाशीला स्थगिती देण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.

 

मुकेश कुमार सिंह याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, यानंतर तिहार कारागृहात माझा प्रचंड छळ करण्यात आला. बलात्काराच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबर २०१२ रोजी मला दिल्लीत आणण्यात आले. सरकारी वकिलांनी मुकेश सिंहचा हा आरोप फेटाळून लावला आहे. केवळ फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या याचिकेवर आजच निकाल दिला जाणार आहे.

Protected Content