ट्रकने दुचाकीला उडविले : पिता-पुत्र जखमी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव वेगाने धावणार्‍या ट्रकने दिलेल्या धडकेत पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत.

तालुक्यातील जानवे येथील कैलास नंदलाल पाटील हे आपल्या चार वर्षांच्या मुलाला घेऊन अमळनेरकडे येत होते. रात्री साडेआठच्या सुमारास अमळनेरहून धुळ्याकडे जाणार्‍या ट्रकने ओव्हरटेक करताना त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात कैलास पाटील आणि त्यांचा मुलगा जबर जखमी झाला.

अपघात झाल्यानंतर येथून जाणार्‍या धुळे येथील केतन सोनवणे या तरुणाने आपल्या चारचाकीतून या बाप-बेट्याला रूग्णालात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना धुळे येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: