Home क्राईम बालिकेवर अत्याचारप्रकरणी नराधमास ३ दिवसाची पोलीस कोठडी

बालिकेवर अत्याचारप्रकरणी नराधमास ३ दिवसाची पोलीस कोठडी


जळगाव प्रतिनिधी । घराबाहेर खेळत असलेल्या पाच वर्षीय बालिकेला घरात बोलवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या रवींद्र पुना रंधे(वय ६०) या नराधमास सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे.

पाच वर्षीय बालिका घराजवळील एका शासकीय कार्यालयाच्या भिंतीजवळ कुत्रीच्या लहान पिल्लांजवळ दुपारी खेळत होती. त्यावेळी संशयिताने बालिकेस घरात बोलवून घेत तिच्यावर अत्याचार केला. घरी आल्यानंतर पीडित बालिकेला असह्य त्रास होऊ लागला. तिने आजीला ही माहिती दिली. कोण होता त्रास देणारा असे विचारल्यानंतर पीडितेने संशयीताचे नाव सांगीतले. यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशन फिर्याद दिल्याने या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येवून रवींद्र रंधे याला पोलिसांनी अटक करत सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्या. कटारी यांनी नराधमास तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. केतन ढाके यांनी काम पाहिले.


Protected Content

Play sound