एकनाथराव खडसेंना आता विधानपरिषदेचे आश्‍वासन

जळगाव प्रतिनिधी । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला विधानपरिषदेच्या उमेदवारीचे आश्‍वासन दिले असून आता या आश्‍वासनपूर्तीची प्रतिक्षा असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथराव खडसे यांनी निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी राज्यसभेत डावलण्यात आल्यावर खडसे म्हणाले की, राज्यसभेसाठी मी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. ही उमेदवारी मलाच नको होती. घरात आधीच एक खासदार लोकसभेत असताना दुसरा कशाला हवा, ही माझी भूमिका होती. मात्र विधान परिषदेला संधी मिळाल्यास आपण नकार देणार नाही. राज्याच्या राजकारणात आपण सक्रीय आहोत. या सभागृहात आधीही आपण काम केले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आश्‍वासन दिले असल्याने आता पक्ष संधी देतो का ? याकडे लक्ष असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व जिल्हा दूध संघात सर्वपक्षीय मिळून चांगले काम होत यंदाची निवडणूकही सर्वपक्षीय पॅनल करून लढवण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती एकनाथराव खडसे यांनी दिली.

Protected Content