चाळीसगाव तालुक्यात चंदन चोर अटकेत

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पाटणादेवी जंगलातून चोरलेल्या सुमारे १३.४ किलो चंदनासह एकाला मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, पाटणादेवी गौताळा अभयारण्य हे धार्मिक स्थळ तसेच ऐतिहासिक निसर्गरम्य पर्यटन म्हणून प्रसिद्ध आहे. या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या वनस्पती वन औषधी मुबलक प्रमाणावर आढळतात. यातच चंदन देखील या जंगलात मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात चंदन चोरीचे प्रकार अनेक वेळा उघडकीस आले असून दिनांक १२ मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. चव्हाण यांनी गुप्त बातमी दाराच्या माहितीनुसार कैलास नथू चव्हाण या संशयित आरोपीस १३ किलो ४०० ग्रम साल काढलेल्या चंदना सह ताब्यात घेतले आहे. कैलास चव्हाण याने अनधिकृतरित्या जंगलातील चंदनाचा हा साठा आपल्या घरात ठेवला असल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे.

या कारवाईत विभागीय वन अधिकारी एस. टी. काळे राहुल शेवाळे वनक्षेत्रपाल कन्नड मनीषा त्रिमाळी, शिंदे आदींचा समावेश होता. पुढील तपास तपास वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण हे करीत आहेत.

Protected Content