नेहता येथील तीन ठिकाणी गावठी दारू हातभट्टी उध्वस्त

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील नेहता गाव शिवारातील तापी नदीच्या पात्रात बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू बनवित असल्याने तीनही गावठी हातभट्टी रावेर पोलीसांनी उध्वस्त केली आहे. याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील नेहते गाव शिवारातील तापी नदीच्या पात्रात बेकायदेशीर दारू तयार करून विक्री होत असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी यांना मिळाल्यानंतर रावेर पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकत संशयित आरोपी कैला पाव्हन तायडे रा. नेहता यांच्याकडे ६ हजार रूपयांची गावठी दारू बनविण्याचे रसायन व १५ लिटरप्रमाणे १२ प्लॅस्टीक कॅनमध्ये दारू नष्ट केली. दुसऱ्या घटनेत संशयित आरोपी सूपडू भिवसन तायडे रा. नेहता याच्याकडून ८ हजार ५०० रूपयांचे कच्चे रसायन, १५ लिटर मापाचे १७ प्लॉस्टिक कॅन दारू नष्ट केली तर तिसऱ्या घटनेत संजय नामदेव तायडे रा. नेहता यांच्याकडे ७ हजार ५०० रूपये किंमतीची दारू आढळून आली. तिघांकडील कच्चे रसायन आणि दारू पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शरीफ तडवी, हे.कॉ. जितेंद्र नारेकर, पो.ना. महेंद्र सुरवाडे, पोकॉ भरत सोपे, पो.कॉ. सुरेश मेढे, पो. कॉ.तुषार मोरे, पो.कॉ. मनोज मस्के या पथक मार्फत नष्ट करण्यात आले.

संचारबंदी बाबत सहा जणांवर कारवाई
कोरोना लॉक डाउन कलम 144 चा भंग करणारे, दुचाकी घेऊन विनाकारण भटकणारे सहा जणांवर कलम 188,269 भादवि प्रमाणे दाखल करण्यात असले असून त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत, तसेच आज पावेतो लॉकडाऊन आपापले घरात लॉकडाउनचे पालन न करणारे, घराबाहेर निघून विनाकारण भटकणारे लोकांवरमध्ये २१ गुन्हे दाखल करण्यात आलेले असून न्यायालयात हजर केले असता सर्वांना १ हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे.

Protected Content