हरताळा फाट्याजवळ एस.टी. बस व चारचाकीचा भीषण अपघात !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील हरताळा फाट्याजवळ एस.टी. बसला भीषण अपघात झाला असून यात दहा प्रवासी जखमी झाले आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, हरताळा फाट्याजवळ आज एमएम १३ सीयू ६७१९ क्रमांकाची आणि जळगाव ते अकोला-मंगरूळपीर बसला आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हरताळा फाट्याजवळ अपघात झाला. यात बस आणि एका चारकाची वाहनाची टक्कर झाली. यात दहा जण जखमी झाले असून यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आराष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने लहान-मोठे अपघात होत असतात. आजचा अपघात देखील याच प्रकारातील असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. एक कार रिव्हर्स घेत असतांना हा अपघात झाल्याचे समजते. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी कार्यकर्त्यांना घटनास्थळी पाठविले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content