Home राजकीय शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी

शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी

0
26

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेने राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

राज्यसभेवर शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्याने त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात येईल असे मानले जात होते. तथापि, शेवटच्या टप्प्यात अचानक प्रियंका चतुर्वेदी यांचे नाव समोर आले. यातच पक्षाने अखेर त्यांच्याच नावावर मोहर उमटवली आहे. प्रियंका चतुर्वेदी या गेल्या वर्षी काँग्रेसमधून शिवसेनेत आल्या होत्या. पक्षाने त्यांच्यावर प्रवक्तदेपदाची जबाबदारी टाकली होती. यानंतर आता त्या थेट राज्यसभेत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound