जळगावात शॉर्टसर्किटमुळे कापड दुकानाला आग

जळगाव प्रतिनिधी । फुले मार्केटमधील एका कापडाच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने लाखो रूपयांचा माल जळून खाक झाल्याची घटना मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, करन श्रावणकुमार तलरेजा (वय-२८) रा. कंवरनगर, सिंधी कॉलनी यांचे सेट्रल फुले मार्केटमध्ये पुजा कलेक्शन कापडाचे दुकान आहे. ११ मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास दुकानाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने दुकानातील लाखो रूपयांचे ड्रेस मटेरियल जळून खाक झाले. दरम्यान आग लागल्याची माहिती मार्केटमधील वॉचमनच्या लक्षात आल्याने त्यांनी दुकान मालकाशी संपर्क साधून दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. करन तलरेजा यांनी तातडीने अग्नीशमन विभागाशी संपर्क साधला. पालिकेच्या अग्नीशमन बंबाने आग विझविण्यात आली. ही आग रात्री लागल्याने अग्नीशमन बंब आत घेता आले. मात्र ही आग जर दिवसा लागली असती तर इतर दुकाने देखील जळून खाक झाले असते अशी माहिती करन तलरेजा यांनी सांगितले. दुकानाला लागलेल्या आगीत सुमार २३ ते २६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी शहर पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content