Home आरोग्य पिंपरी चिंचवडमध्ये आढळली करोना संशयित महिला

पिंपरी चिंचवडमध्ये आढळली करोना संशयित महिला

0
32


पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील करोनाग्रस्तांची संख्या पाचवर गेलेली असतांना पिंपरी-चिंचवडमध्येही करोना व्हायरसची संशयित महिला रुग्ण आढळल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

करोनाची लक्षण आढळून आल्यानंतर संबंधित महिलेला तात्काळ नायडू रुग्णालयात हलवण्यात आले. ही महिला कुटुंबासोबत राहत असल्याने तिच्या कुटुंबीयांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील एका दाम्पत्याला करोना संसर्ग झाल्याचे सोमवारी सायंकाळी स्पष्ट झाले. हे दांपत्य दुबई येथे सहलीसाठी जाऊन आले होते. नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.


Protected Content

Play sound