Home क्राईम सांगलीतील एकाच कुटुंबातील तिघांची निर्घुण हत्या !

सांगलीतील एकाच कुटुंबातील तिघांची निर्घुण हत्या !

0
44


सांगली (वृत्तसंस्था) सांगलीत एकाच कुटुंबातील तिघांची निर्घुण हत्या झाल्याचा प्रकार आज पहाटे उघडकीस आला आहे. दरम्यान, मालमत्तेच्या वादातून सख्या मुलाने खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सांगली जिल्ह्यातील उमदी गावात अरकेरी परिवारातील ८२ वर्षीय गुरलिंगाप्पा आण्णाप्पा अरकेरी, ७५ वर्षीय पत्नी नागव्वा गुरलिंगाप्पा अरकेरी आणि ६२ वर्षीय समुद्राबाई शिवलिंगाप्पा बिरादार यांचे मृतदेह आढळले होते. धारदार शस्त्राने हल्ला करत आई, वडील आणि बहिणीचा पोटच्या मुलगा सिदाप्पा गुरलिंगाप्पा अरकेरी याने निर्घृण खून केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound