नवी दिल्ली वृत्तसंस्था । मध्यप्रदेशातील मातब्बर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील होते. दरम्यान, या भेटीनंतर त्यांनी त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून याबाबतचे पत्र पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविले आहे. शिंदे यांनी आज ट्विट करून हे राजीनामापत्र जगासमोर जाहीर केले आहे. या पत्रावर ९ मार्च ही तारीख आहे. अर्थात, त्यांनी कालच पक्षाचा राजीनामा दिला असून आज याबाबत माहिती जाहीर केल्याचे स्पष्ट झाले आहे.
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) March 10, 2020