भुसावळात आंतरराष्ट्रीय हॉकीपटू प्रिती दुबे यांचा सत्कार

भुसावळ प्रतिनिधी । महिला दिनाचे औचित्य साधून येथील प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी तथा आंतरराष्ट्रीय हॉकीपटू प्रिती दुबे यांचा सत्कार करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रेल्वे प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने महिला रेल्वे कर्मचारी प्रीती दुबे यांचा सन्मान करण्यात आला. त्या भुसावळ येथील झेडआरटीआयमधे प्रशिक्षण घेत असून मुंबई येथे कार्यरत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिनीयर डिपीओ एन. डी. गांगुर्डे यांनी केले. त्यात त्यांनी प्रीती दुबे यांचा परिचय करून दिला आणि रेल्वे तर्फे महिला खेळाडूंना दिल्या जाणार्‍या सोयी सुविधां बाबत माहिती सांगितली. प्रीति दुबे यानी २०१० पासुन हॉकी खेळण्यास सुरुवात केली. ग्वालियर ला त्यांनी तीन वर्ष प्रशिक्षण घेतले. त्यानंतर भारतीय रेल्वे टीम मध्ये निवड झाली.त्यानंतर ज्युनियर आशिया कप खेळात सुवर्ण पदक प्राप्त झाले. साऊथ एशियन गेम्स तसेच २०१६ मध्ये रिओ ओलंपिक मधे भारतीय हॉकी टीम मध्ये सहभाग घेतला. त्या २०१८ पासून रेल्वे मध्ये कार्यरत आहेत.

डीआरएम विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते प्रीती दुबे यांना मानपत्र, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते म्हणाले प्रीती यांचे विशेष अभिनंदन भारताचे प्रतनिधीत्व त्यांनी हॉकी मध्ये केले आणि आता रेल्वे परिवाराच्या त्या सदस्य झाल्या. रेल्वे प्रशसनाकडून नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते, आपल्या कडून आपल्या देशासाठी आणि भारतीय रेल्वे साठी भरीव कामगिरी होवो या साठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना प्रीती दुबे म्हणाल्या एका विशिष्ट वयापर्यंत खेळाडू खेळू शकतो पण नंतर त्याला पाठबळाची आवश्यकता असते. भारतीय रेल्वे ते मला दिले आणि निश्‍चिंत पणे आता माझ्या खेळावर मी लक्ष केंद्रित करू शकते. आपण मला सन्मान दिला त्या बद्दल मी आभारी आहे आणि माझ्याकडून देशाचे आणि भारतीय रेल्वेचे नाव उंचाविण्या साठी मी सदैव तत्पर राहील असे सांगितले. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आभार प्रदर्शन एपीओ आर. एच. परदेशी एपीओ यांनी केले तर सूत्र संचालन वरिष्ठ कल्याण निरीक्षक दीपा स्वामी यांनी केले.

Protected Content