ऑनलाईन ऑर्डर करून मागविली स्फोटकांची सामग्री !

नवी दिल्ली । पुलवामा हल्ल्यातील स्फोटके तयार करण्याची सामग्री ही दहशतवाद्यांनी ऑनलाईन शॉपींग पोर्टलवरून मागविली होती अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी दक्षिण काश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखील पोलिस दलाच्या तुकडीवर मोठा आत्मघाती हल्ला झाला होता. या स्फोटामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी जागीच ठार झाला होता. आता या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये एका या प्रकरणी एनआयएने श्रीनगरमधील बाग-ए-मेहताब भागातील वजीर-उल-इस्लाम (१९) आणि पुलवामाच्या हकीपुरा गावातील मोहम्मद अब्बास राठेर (३२) या दोघांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीमध्ये इस्लामने सांगितले आहे की, जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी दिलेल्या आदेशांनुसार त्याने आयईडी बॉम्ब बनविण्यासाठी रसायन, बॅटरी आणि अन्य सामुग्री खरेदी करण्यासाठी त्याच्या ऑनलाईल शॉपिंग अकाऊंटचा वापर केला आहे, असे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले. त्याने या वस्तू अ‍ॅमेझॉनवरून मागवून त्या जैशच्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचविल्या. राठेरनेही जैशचा आयईडी ब़ॉम्ब बनविणारा तज्ज्ञ मोहम्मद उमर जेव्हा मे २०१८ मध्ये काश्मीरमध्ये आला होता, तेव्हा त्याला घरामध्ये राहण्यास दिले होते.

दरम्यान, याशिवाय राठेरने पुलवामा हल्ल्यातील दहशतवादी आदिल अहमद डार, समीर डार आणि पाकिस्तानी कामरान याला त्याच्या घरामध्ये रहायला दिले होते. याशिवाय त्याने या दहशतवाद्यांना हकरीपुरामध्ये तारिक शाह आणि त्याची मुलगी इंशा जान यांच्या घरातही राहण्यासाठी मदत केली होती.

Protected Content