Home Cities जळगाव वंचित बहुजन आघाडीचा दणका ; २४ तासाच्या आतच पाईप लाईनदुरुस्त

वंचित बहुजन आघाडीचा दणका ; २४ तासाच्या आतच पाईप लाईनदुरुस्त

0
79

 

भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील हॉटेल सुहास जवळ सुरु असलेल्या फोरवेच्या कामामुळे सुमारे ४-५ दिवसांपासून पाण्याची पाईप लाईन फुटलेली होती. ती तत्काळ दुरुस्ती करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला होता. मात्र हे काम वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याने २४ तासाच्या आत करण्यात आले आहे.

भुसावळ येथे नागरिकांना १५ दिवसानी पाणी पुरवठा होत असतो आणि यात पाईप लाईन फुटीमुळे आणखी अडचण निर्माण झालेली होती. याबाबत फोरवेचे इंजिनिअर व अधिकारी यांना विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळत नसे. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे , जिल्हा महासचिव दिनेश ईखारे यांनी पत्रकाद्वारे आवाहन केले होते. २४ तासाच्या आत पाईप लाईनचे काम न झाल्यास रास्तारोको आंदोलन करुअ सा इशारा आणि १२ तासाच्या आतच पाईपलाईनचे दुरूस्तीचे काम वंचित बहुजन आघाडीच्या दणक्यामुळे तात्काळ करण्यात आले.


Protected Content

Play sound