कंपाऊंडचे कुलूप तोडून लांबवली दुचाकी

जळगाव प्रतिनिधी । एसएमआयटी कॉलेज परिसरातील मुक्ताईनगरात एका घराच्या कंपाऊंडचे कुलूप तोडून दुचाकी लांबवल्याची घटना आज उघडकीस आली.

निलेश यशवंत देसले (रा.एसएमआयटी कॉलेज परिसरातील मुक्ताईनगर) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ एवाय ५६९२) चोरीस गेली आहे. देसले कुटुंबिय बुधवारी रात्री १२ वाजेनंतर झोपले होते. गुरुवारी सकाळी सात वाजता त्यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये उभी केलेली दुचाकी चोरीस गेल्याचे आढळुन आले. देसले कुटुंबियांनी चौकशी केली असता चोरट्यांनी कंपाऊंडचे कुलूप तोडून फेकलेले दिसून आले. या प्रकरणी निलेश देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुरूषोत्तम करीत आहेत.

Protected Content