कासोद्यातील अंगणवाडी सेविका पुन्हा सेवेत

 

कासोदा, प्रतिनिधी । येथील अंगणवाडी सेविका ५ महिन्यांच्या बहू प्रतिक्षे नंतर आज पुन्हा सेवेत हजर झाल्या आहेत. यासंदर्भातील बालविकास प्रकल्प अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले पत्र प्राप्त झाले आहे.

रंजना माधवराव मराठे यांना ग्रामस्थांच्या तक्रारीने एरंडोल येथील बालविकास प्रकल्प अधिकारी सैलजा पाटील यांनी इंदिरा नगर भागातील अंगणवाडी क्र. २२ येथे दि. १ आक्टोबर २०१९ रोजी चौकशी अंती ५ महिन्यांपर्यंत हलगर्जीपणाचे कारण देऊन सेवामुक्त केले होते. परंतु, अंगणवाडी सेविका रंजना मराठे यांनी जळगांव जिल्ह्या जि. प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे अपिल केले असता. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सकोल चौकशी करून रंजना मराठे यांच्या पक्षात निकाल दिला आहे. त्यांना दि.२८ फेब्रुवारीच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या पत्रात अटी व शर्तीसह तात्पुरती व अस्थायी स्वरूपाची नेमणुक केल्याचे एरंडोल येथील बालविकास प्रकल्प अधिकारी सैलजा पाटील यांनी दि. ३ मार्च २०२० रोजी सेवेत पुन्हा रुजू होण्याच्या पत्रात नमूद केले आहे. या पत्रावर बालविकास प्रकल्प अधिकारी यांची स्वाक्षरी आहे.

Protected Content