Home Cities जळगाव अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला


 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गंधर्व कॉलनीतील 16 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर शारिरीक अत्याचार केल्याची घटना 10 नोव्हेंबर 2019 रोजी घडली होती. संशयिताने जामीनासाठी अर्ज केला होता तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी संशयित तरुण राजेश श्रावण मोरे (वय 22) रा. हनुमान नगर, मरिमात मंदिराजवळ, पिंप्राळा हुडको यास 6जानेवारी रोजी अटक केली. तो सद्यस्थितीत न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहे. संशयितांतर्फे जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. न्या. आर.जे.कटारिया यांनी जामीनअर्ज फेटाळून लावला आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले.


Protected Content

Play sound