पोलिसाच्या पित्यासह आईचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला

जळगाव प्रतिनिधी । शनिपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील यांची पत्नी भाग्यश्री पाटील (वय 26) हिने गळफास घेवून आत्महत्या केली होती. यााप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रशांत पाटील यांच्यासह आई वडीलांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल आहे. आज प्रशांतचे आई वडीलांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर केले असता न्यायालयाने दोघांचे अर्ज फेटाळून लावला.

नेहरु नगरातील राहत्या घरी भाग्यश्री पाटील हिने आत्महत्या केली होती. याप्रकरणी अरुण जगन्नाथ पाटील (वय 61) रा.धुळे यांच्या फिर्यादीवरुन खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संशयित पती यात प्रशांत पाटील यासत अटक करण्यात आली असून तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर त्याची आई प्रतिभा पाटील व वडील प्रकाश पाटील हे दोनही फरार आहेत. या दोघांतर्फे न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आले. मंगळवारी त्यावर न्या. कटारिया यांच्या न्यायालयात कामकाज झाले. न्यायाधिश आर.जे. कटारिया यांनी दोघांना अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून लावले आहेत.

Protected Content