Home राजकीय मोदी प्रेरणादायी महिलांना सुपुर्द करणार सोशल मीडिया अकाऊंट !

मोदी प्रेरणादायी महिलांना सुपुर्द करणार सोशल मीडिया अकाऊंट !

0
36
Narendra Modi Indian elections 2019 Modi Narendra Modi news 938x450

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया सोडणार नसून ते महिला दिनाच्या दिवशी प्रेरणादायी महिलांना आपले अकाऊंट सोपविणार असल्याची माहिती त्यांनी आज दिली आहे.

काल पंतप्रधान मोदी यांनी आपण रविवारी सोशल मीडियाचे अकाऊंट सोडणार असल्याची माहिती दिल्याने खळबळ उडाली होती. यावरून अनेक प्रकारची उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. यावर आता खुद्द त्यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आपण सोशल मीडियाचा त्याग करणार नसून महिला दिनाच्या दिवशी प्रेरणादायी महिलांना अकाऊंट देणार आहोत.

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘यंदाच्या महिला दिनानिमित्त मी माझे सोशल मीडिया अकाऊंट प्रेरणादायी कार्य करणाऱ्या महिलांना समर्पित करणार आहे. त्यामुळे लाखों लोकांना प्रेरणा मिळेल. तुम्ही अशाच महिलांपैकी एक आहात का? किंवा तुम्हाला अशा महिलांपैकी कुणाची माहिती आहे का? तर #SheInspiresUs या हॅशटॅगसह त्यांची कहाणी शेअर करा. त्यांचा व्हिडीओ असल्यास यूट्युबवर पोस्ट करा’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.


Protected Content

Play sound