Home आरोग्य दिल्लीत आढळला करोना पॉझिटिव्ह

दिल्लीत आढळला करोना पॉझिटिव्ह

0
44


 

दिल्ली, वृत्तसेवा । करोना व्हायरसची दहशत जगभरात पसरल्यानंतर हा व्हायरस राजधानी दिल्लीपर्यत येऊन ठेपला आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली असून दिल्लीबरोबरच तेलंगणमध्ये देखील एकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दिल्लीत ज्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, ती व्यक्ती इटलीहून आल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरी व्यक्ती ही दुबईहून आली आहे. या पूर्वी केरळमध्ये करोना व्हायरसचे तीन पीडित आढळल्याचे वृत्त यापूर्वीच प्रसिद्ध झाले होते.


Protected Content

Play sound