Home क्राईम राष्ट्रीय महामार्गावर वाहनाने तरुणाला चिरडले

राष्ट्रीय महामार्गावर वाहनाने तरुणाला चिरडले

0
36
death

जळगाव प्रतिनिधी । महामार्गावरील खड्ड्यात दुचाकी घसरल्यानंतर पाठीमागून येणार्‍या वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. बांभोरीजवळ हॉटेल साईनाथसमोर हा अपघात झाला.

भाऊसाहेब प्रभाकर कोळी (वय ३०, रा.चांदसर, ता.धरणगाव) हा तरूण माहेरी गेलेल्या पत्नीस घेण्यासाठी दुचाकीने (एमएच- १९, एजी- ८०४४) निघाला होते. त्यांच्या पत्नी मुलांसह साकेगाव (ता.भुसावळ) येथे माहेरी गेल्या होत्या. कोळी हे दुचाकीने निघाल्यानंतर महामार्गावरील एका खड्ड्यातून त्यांची दुचाकी घसरली. यामुळे तोल जाऊन ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. याच वेळी मागून येणार्‍या एका वाहनाने कोळी यांना चिरडले. यानंतर वाहनचालक वाहनासह पळून गेला. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली. नागरिकांनी कोळी यांचा मोबाइल ताब्यात घेऊन त्यामधील काही क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. यानंतर चांदसर गावातील तरुणदेखील घटनास्थळी पोहोचेले. जैन इरिगेशन कंपनीच्या रुग्णवाहिकेने कोळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून कोळी यांना मृत घोषित केले. अपघाताच्या या घटनेनंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. मृत कोळी यांच्या पश्‍चात आई-वडील, एक विवाहित बहिण, पत्नी मनीषा, मुले वैशाली (वय ९), काजल (७) व प्रेम (४) असा परिवार आहे.


Protected Content

Play sound