पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वक्तव्येही दिल्ली दंगलीला कारणीभूत : शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीतील विधानसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा प्रचाराचा रोख पाहिला तर धार्मिक तेढ निर्माण करणारा होता. पंतप्रधान यांचे भाषण ऐकले तर लक्षात येते. देशाचे नेतृत्व करणारी व्यक्तीच धार्मिक वाद वाढवण्याचे वक्तव्य करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वक्तव्येही या दंगलीला कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला.
 
चुनाभट्टीच्या सोमय्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता शिबिराचे आयोजन केले होत. त्याला संबोधित करताना शरद पवार यांनी दिल्लीतील हिंसाचारावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी पवार बोलेले की, दिल्लीतील दंगलीची १०० टक्के जबाबदारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचीच असून ही दंगल रोखण्यात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरले आहेत. दिल्ली शहर अनेक भाषिकांचे आहे. राजधानीचे शहर आहे. दिल्लीच्या निर्मितीपासूनच भाजपाला जनतेचा पाठिंबा मिळण्याची चिन्ह नव्हती. सत्ता मिळण्याची चिन्हही दिसत नाही. त्यामुळे यावेळी सांप्रदायिकतेचा आधार घेऊन जातीय सलोखा बिघडवण्याचे काम झाले आहे, असा थेट आरोप शरद पवार यांनी केला. मिळालेली सत्ता जनतेसाठी वापरण्याऐवजी भाजपचे नेते ‘गोली मारो’ची भाषा करताना दिसले. दिल्लीच्या शाळेवरही हल्ला केला गेला. शैक्षणिक वस्तू नष्ट केल्या गेल्या. जी शक्ती देशाच्या ऐक्याला धक्का देण्यासाठी सरसावत आहे, तिला दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content