भुसावळ रेल्वे न्यायालयाचा दणका : आरोपींना दंड व शिक्षा

भुसावळ प्रतिनिधी । येथील रेल्वे न्यायालयाने स्थानकावर हाणामारी, तोडफोड, भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपींना दंड व शिक्षा ठोठावली आहे.

काही दिवसांपुर्वीच जळगाव येथून बदलून आलेले न्या. एच.डी.देशिंगे यांनी रेल्वे स्थानकावर हाणामारी,तोडफोड,भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपींना दंड व शिक्षा ठोठावली आहे. चाळीसगाव रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाणामारी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान नुकसान प्रकरणात सुर्यभान मल्हारी यांच्यासह ११ जणांना दोषी ठरवून कलम १४३ मध्ये ३ महीने शिक्षा,कलम १४८ मध्ये १ वर्ष शिक्षा,कलम ४५२ मध्ये २ वर्षे शिक्षा व १० हजार दंड आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी १ वर्ष शिक्षा व १ हजार रू.दंड ठोठावला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणुन गणेश शिरसाठ यांनी काम पाहिले.

तसेच भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडण करून शांतता भंग करणार्‍या पती-पत्नीस १ हजार रू.दंड ठोठावला. तसेच रेल्वे प्रवासात महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी दोषी ठरवून १ हजार रु.दंड व १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.या दोन्ही प्रकरणात भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे पो. नि. दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाणसिंग राजपूत यांनी बाजू मांडण्याचे काम केले. या प्रकरणांमध्ये सरकारी वकील राकेश चौधरी यांनी विविध न्यायालयांच्या निकालांचे दाखले दिले होते.

Protected Content