Home राष्ट्रीय जम्मू-काश्मिरच्या पिंगलीनामध्ये चार जवान शहीद

जम्मू-काश्मिरच्या पिंगलीनामध्ये चार जवान शहीद

0
28


श्रीनगर वृत्तसंस्था । पुलवामा येथील हल्ल्याच्या जखमा ताज्या असतांना जम्मू-काश्मिरात पुन्हा चार जवान शहीद झाल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत माहिती अशी की, पुलवामा परिसरातील पिंगलीना येथील एका घरात लपून बसलेल्या अतिरेक्यांना भारतीय जवानांनी घेरून चकमक सुरू झाली होती. आज पहाटे तीन वाजेपासून ही चकमक सुरू होती. यात चार भारतीय जवान पुन्हा शहीद झाल्यामुळे देशाला पुन्हा धक्का बसला आहे. पुलवामा येथे ४० जवान शहीद झाले. यानंतर मेजरसह एक जवान हुतात्मा झाले. तर आज पुन्हा चार जवान शहीद झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही चकमक सुरूच असून यात एक नागरिकदेखील ठार झाल्याचे वृत्त आहे. तर वीरगती प्राप्त झालेल्यांमध्ये मेजर डी.एस. डोंडीयाल यांच्यासह सेवाराम, अजयकुमार व हरीसिंग या तीन जवानांचा समावेश आहे. हे सर्व हुतात्मे ५५ राष्ट्रीय रायफल्सशी संबंधीत होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound