हिंसक जमावाने फाडले कपडे, महिलेने मुलीसह मारली इमारतीवरून उडी !

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीत हिंसक घटना घडत असताना मी घरीच होते. अचानक जाळपोळ करणारा जमाव घरात घुसला. जमावानं मला आणि माझ्या मुलींना छेडायला सुरूवात केली. त्यानी कपडेही फाडले. त्यामुळे मी आणि मुलींनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारून जीव वाचवला, अशी अंगावर शहारे आणणारी कहाणी एका पिडीत महिलेने रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सांगितली आहे.

 

राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. सोमवारी चार असलेला मृतांचा आकडा शुक्रवारी ४२वर पोहोचला आहे. दरम्यान, या हिंसाचारादरम्यान अंगावर शहारा आणणाऱ्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यानुसार उत्तर पूर्व दिल्लीतल्या अल हिंद रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४५ वर्षीय महिलेने हिंसाचारादरम्यान घडलेली घटना सांगितली. जमावाने मला आणि माझ्या मुलींना छेडायला सुरूवात केली. त्यांनी कपडेही फाडले. त्यामुळे मी आणि मुलींनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारून जीव वाचवला. उड्या मारल्यानंतरही जमाव आमच्यामागे लागला होता. पण, मी एक जवळच असलेले दुकानदार अयुब अहमद यांनी आमची मदत केली. त्यांनी आम्हाला जेवायला दिले. गरजेच्या वस्तू दिल्या. तसेच त्यानंतर रुग्णालयातही दाखल केले. मी छेड काढणाऱ्यांना ओळखू शकते,असेही या पिडीत महिलेने सांगितले.

Protected Content