महिलांना गंडविणार्‍या संस्थेविरूध्द गुन्हा

FIR

जळगाव प्रतिनिधी । गृहउद्योग मिळवून देण्याच्या नावासाठी प्रत्येकी ४०० रुपयांप्रमाणे पैसे गोळा करून हजारो महिलांची लाखो रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, प्रज्ञा फाउंडेशनने १ एप्रिल २०१९पासून शहर व ग्रामीण भागात सभासद गोळा करण्यास सुरुवात केली होती. याच्या अंतर्गत महिलांना घरबसल्या काम मिळवून देण्याचे आमिष दिलेे. याते प्रति महिला ४०० रुपये गोळा केले. बारी यांनी पैसे भरल्यानंतर त्यांच्या माध्यमातून आणखी महिला सभासद करण्यात आले. जिल्ह्यात हजारो महिलांनी या संस्थेत पैसे भरून काम मिळवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, पैसे भरूनही काम मिळत नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून महिलांनी तगादा लावला होता. याबाबत चित्रा सूरज पाटील, आयशा शेख इसाक, वंदना भरत जाधव, सरिता किशोर बारी आदी महिलांनी संस्थेच्या संचालिका वैशाली सोलंकी व भानुदास पवार यांची वेळोवेळी भेट घेऊन कामाबद्दल विचारणा केली. काम देता येत नसेल तर पैसे परत करा, असेही महिलांनी त्यांना सुचवले होते. अखेर नीता बारी यांनी दोघांविरुद्ध फिर्याद दिली.
यानुसार जिल्हापेठ पोलीस स्थानकात प्रज्ञा संजीवन फाउंडेशन या संस्थेचे संचालक वैशाली श्यामकुमार सोलंकी, भानुदास शिवाजी पवार व त्यांच्या साथीदारांनी फसवणूक केल्याचा गुन्हा नीता संजय बारी (वय ३८, रा. गणेश कॉलनी) यांनी दाखल केला आहे. फिर्यादीत ११ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा उल्लेख आहे.

Protected Content