जळगाव प्रतिनिधी। महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. दैनंदिन जीवनात व कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याचा संकल्प उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने केला.
याप्रसंगी मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) चंद्रशेखर मानकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) नेमिलाल राठोड, कार्यकारी अभियंता (प्र) नितीन पाटील, उपकार्यकारी अभियंता दिनेश पाटील, कनिष्ठ विधी अधिकारी जिवन बोडके आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
महावितरणात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
5 years ago
No Comments