निष्क्रीय महाराष्ट्र शासनाविरोधात चोपड्यात भाजपचा ‘एल्गार’

chopdanews

चोपडा प्रतिनिधी । शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीच्या घोषणेचा अवलंब न करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेबाबत मूग गिळून बसलेल्या महाराष्ट्र शासनाला जाग यावी म्हणून चोपड्याच्या तहसील कचेरीवर भारतीय जनता पक्षातर्फे ‘एल्गार’ पुकारण्यात आला. शेतकरी व राज्यातील जनतेची महाविकास आघाडी सरकारने फसवणूक केल्याचा ठपका ठेवून कार्यकर्ते, पदाधिकारी व जनतेने तिव्र आंदोलन करण्यात आले.

या धरणे आंदोलनाला तहसील कचेरी परिसरात सकाळी ११ वाजता प्रारंभ करण्यात आला.निष्क्रिय सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ‘तीन तिघाड काम बिघाडा’ सरकार जनतेची कशी फसवणूक करीत आहे.याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाषणे करुन सरकारवर जोरदार हल्ले चढविले. तसेच तहसिलदार अनिल गावित यांना महिला पदाधिकाऱ्यांचे हस्ते विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.एम.आय.एम.चा वारीस पठाण यानी देशातील सामाजिक एकोप्याला विघातक वक्तव्य केल्याने अत्यंत तिव्र भावना व्यक्त करुन त्याचेवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.

यावेळी भाजपचे जेष्ठ नेते शांताराम पाटील, जी.टी.पाटील, तिलकचंद शहा, चंद्रशेखर पाटील, विस्तारक प्रदीप पाटील, माजी पं.स.सभापती आत्माराम म्हाळके, जि.प.च्या सभापती ज्योती पाटील, उज्वला म्हाळके, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जायसवाल, जि.प.गजेंद्र सोनवणे, पं.स.उपसभापती भुषण भील, कृउबा संचालक धनंजय पाटील, भरत पाटील, मगन बाविस्कर, हनुमंत महाजन, सूतगिरणी संचालिका रंजना नेवे, शेतकी संघ संचालक हिंमतराव पाटील, प्रकाश पाटील,चोसाका संचालक अनिल पाटील, डॅा.विकी सनेर, तुषार पाठक, पिंटू पावरा, कैलास पाटील, भारती क्षिरसागर, यशवंत जडे, दिपक पाटील, विष्णू चौधरी, राकेश पाटील, जितेंद्र महाजन, सुनिल सोनगिरे, मनोहर बडगुजर, विशाल भोई, यश शर्मा, मनोहर पाटील, हेमंत जोहरी, प्रेम घोगरे, जयंता कुलकर्णी, मोहित भावे, रितेश शिंपी, ललिता सोनगिरे, योगराज पाटील, परेश धनगर, रंजना मराठे, वंदना पाटिल, मीनाबाई बडगुजर, ललीता सोनगिरे, माधुरी अहिरराव, आरती माळी, वंदना बडगुजर आदी उपस्थित होते.

Protected Content