पिंप्राळा परीसरात तरूणावर चॉपर हल्ला; एकाला अटक

crime 151889 730x419

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा परीसरात २४ वर्षीय तरूणावर चौघांनी चॉपर हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा येथील मढी चौकात नितेश मिलींद जाधव (वय-24) कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. रविवार (ता.23) रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास नितेश घरा जवळच व्यायामाच्या जागेवर बसलेला असतांना गोलू धनगर व गोलू गुर्जर असे दोघेही त्याच्या जवळ आले. मला सुपडू ठाकुरचा मोबाईल नंबर देत, असे म्हटल्यावर नितेशने नंबर देण्यास नकार दिल्याने वादाची ठिणगी पडली. दोघांनी नितेशला मारझोड करून निघुन गेले. अर्ध्यातासात परत गोलू धनगर हा त्याचा मित्र विशाल कोळी, अक्षय ऊर्फ बाब्या धोबी, दुधफेडरेशन कडे राहणारा गोलू असे चौघेही परत आले. चौघांनी पुन्हा मारहाण करण्यास सुरवात करून अक्षयच्या गाडीतून विशालने चॉपर काढून नितेशच्या पाठीवर सपासप वार करुन जखमी केले. त्यानंतर गोलू धनगर याने डोक्‍यात फरशी मारली, इतक्‍यावरच चौघे थांबले नाही तर, जखमांवर लाथांनी चिरडून आरोळ्या मारण्यास सांगत आज तुला मारुन टाकू असे म्हणत बेशुद्धावस्थेत सोडून पळ काढला. परिसरातील नागरीकांनी कुटूंबीयाना कळवल्यावर नितेशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्या वर प्रथमोपचार करुन खासगी अतिदक्षता विभागात त्याला हलवण्यात आले. रुग्णालयात जावून पोलिस नाईक विनोद सोनवणे यांनी जखमीचा जबाब नोंदवल्यावरुन चौघांच्या विरुद्ध प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी करीत आहेत.

Protected Content