लग्नासाठी बनविलेले सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

FIR

यावल प्रतिनिधी । लग्नासाठी बनविलेले सोन्याचे दागिने मुलीसह तिच्या प्रियकरासह इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहीती अशी की, तालुक्यातील डांभुर्णी गावात राहणाऱ्या नर्मदा सुधाकर कोळी (वय-६५) यांची न्यायलयाच्या सिआरपीसी १५६ (3)प्रमाणे आदेशान्वये फिर्याद नोंदविण्यात आली असुन या फिर्यादी नर्मदा कोळी यांनी म्हटले आहे. नम्रता मोहन कोळी (वय-१८) रा. डांभुर्णी व रोशन उर्फ रविंद्र गणेश भंगाळे (वय-२६) यांच्यासोबत गणेश रामचंद्र भंगाळे (वय-५६), मुकुंदा गणेश भंगाळे (वय-३१), मंगला गणेश भंगाळे (वय-५२) व सोनी मुकुंदा भंगाळे (वय-२७) सर्व रा.डांभुर्णी ता. यावल यांनी संगतमताने मिळुन २७ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी १२ वाजता वरील आरोपी नम्रता कोळी हिचे व आरोपी रोशन उर्फ रविंद्र गणेश भंगाळे यांचे प्रेमसंबंध असतांना वरील सर्व आरोपीनी फिर्यादींची नात हिला भुरळ घालुन खोटे आश्वासन देवुन तिचे लग्न दुसऱ्या ठिकाणी जुळलेले असताना तसेच लग्नाची तयारी सुरू असतांना तिच्या मावशीने दिलेले २ लाख ५० हजार रुपये किमतीचे ३७ ग्रॅम वजनाची व ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि १२.५ ग्रॅम वजनाची सोन्याची नेकलेस व २२ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी यावल पोलीसात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content