Home क्राईम शिरसोली येथून दुचाकी चोरणारा संशयित अटकेत; एमआयडीसीत गुन्हा दाखल

शिरसोली येथून दुचाकी चोरणारा संशयित अटकेत; एमआयडीसीत गुन्हा दाखल

0
118

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील बारी नगरातून २० हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना 27 जुलै रोजी घडली होती . याप्रकरणी संशयित गंगाराम तुकाराम ठाकरे वय 25 रा शिरसोली प्र बो बारी नगर जळगाव यास  रविवारी ८ ऑगस्ट रोजी  एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह़यातील दुचाकी हस्तगत करण्‍यात आली आहे.

शिरसोली येथील गंगाराम ठाकरे यांची 27 जुलै रोजी त्यांच्या राहत्या घरासमोरुन एम.एच.19 ए.व्ही 5583 या क्रमांकाची दुचाकी लांबविल्याची घटना 27 जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात एमआयडीसी पोलीसांनी आज रविवारी ८ ऑगस्ट रोजी गंगाराम तुकाराम ठाकरे यास अटक केली आहे.  त्याच्याकडून गुन्ह्यातील दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

 

 


Protected Content

Play sound