शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर

Uddhav Thackeray

मुंबई प्रतिनिधी । महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या अंतर्गत पाहिली यादी जाहीर असून यात ६८ गावांमधील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावे आहेत.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या अंतर्गत ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्याची माहिती संकलित करण्यात आली होती. त्यापैकी ६८ गावातली यादी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकर्‍यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे. जिल्हा पातळींवर कर्जमाफीचं काम सुरु झालं आहे. आता कर्जमाफीसाठी १५ हजार कोटी रुपयांची पुरवणी मागणी पटलावर ठेवली आहे. त्यावर २७ फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, एप्रिल अखेरपर्यंत कर्जमुक्ती टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे.

Protected Content