भुसावळातून मोबाईल चोरट्यास अटक

bhusawal 4

भुसावळ प्रतिनिधी । सकाळी फिरण्यासाठी जात असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घरातून मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणातील एकाला अटक करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, छाया नारायण पाटील रा. भिरूड हॉस्पिटल मागे, जामनेर रोड भुसावळ ह्या २३ फेब्रुवारी सकाळी ५ वाजता मॉर्निंग वॉक करण्यासाठी तयारी करत असतांना सकाळी त्यांनी दरवाजा उघडला होता. दरम्यान दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरटयाने बेडवर ठेवलेला मोबाईल लंपास केला होता. याप्रकणी बाजार पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरटा भुसावळ बसस्थानकाजवळ मोबाईल विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी भुसावळ पोलीसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता त्यांने मोबाईल चोरी केल्याचे कबुल केले. महिलेच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय उर्फ राणा दिलीप चव्हाण वय-20 रा.शनी मंदिर मागे सोनिच्छा वाडी जामनेर रोड भुसावळ संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, डीवाएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, स.पो.नि.अनिल मोरे, स.फौज.तस्लिम पठाण, पो.ना. रमण सुरळकर,उमाकांत पाटील, महेश चौधरी,तुषार पाटील,संदेश निकम,समाधान पाटील, पो.कॉ.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, सुभाष साबळे, सुनिल सांळुखे अशानी केली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. मिलिंद कंक हे करीत आहेत.

Protected Content