बामणोद येथे संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद येथील विविध समाजाच्या तरुणांनी ग्रामस्थांनी सयुक्तपणे एकत्र येवुन राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रवादीचे पदाधिकारी गुणवंत नीळ यांनी सपत्नीक संतगाडगेबाबा महाराज यांचे प्रतिमेचे पूजन केले त्या नंतर सामाजिक कार्यकर्त गणेश काकडे ,किरण केदारे , पत्रकार नरेंद्र सपकाळे यांनी संत गाडगेबाबा यांच्या समाजप्रबोधनसाठी केलेल्या प्रेणादायी कार्य व कर्तृत्वाचे उपस्थित प्रकाश नेमाडे,ग्रामस्थ समोर विशद केले .
अनिल सोनवणे, रमेश पाटील आकाश हिवाळे शंकर सोनवणे , किरण केदारे .पदम़ाकर चौधरी,
माजी सरपंच म्हैसवाडी, अनिल सोनवणे, प्रकाश बाविस्कर ,पंडीत तेली, सुधाकर इंगळे, रविंद्र नीळ, गजानन नरवाडे सुनिल सोनवणे नितिन सोनवणे भागवत तळेले ,मिलींद असटकर,दिलीप बाविस्कर, अनिल चिंतामण सोनवणे, इ ग्रामस्थांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बामणोद गावातील सर्व जातीधर्माच्या तरूण युवकांनी प्रयत्न केले .

Protected Content