Home धर्म-समाज भोरगाव लेवा पंचायतीतर्फे घटस्फोटित, विधवा, प्रौढ,शेतकरी वधू-वर मेळावा

भोरगाव लेवा पंचायतीतर्फे घटस्फोटित, विधवा, प्रौढ,शेतकरी वधू-वर मेळावा

0
136

bhorgaon leva panchyat logo

भुसावळ प्रतिनिधी | भोरगाव लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेतर्फे रविवार २९ मार्च रोजी सकाळी १० वाजता घटस्फोटित विधवा, विधुर, प्रौढ, दिव्यांग, व्यावसायिक, शेतकरी व शेतमजूर विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

भोरगाव लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेतर्फे लेवा समाजातील घटस्फोटित विधवा, विधुर, प्रौढ, दिव्यांग, व्यावसायिक, शेतकरी व शेतमजूर अशा विवाहोत्सुक वधू-वरांचे ८ वे परिचय संमेलन भुसावळात येथील श्री संतोषीमाता बहुउद्देशीय हॉल येथे होणार आहे. त्याचे आयोजन भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभाग व अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे केले आहे. इच्छुकांनी विनामूल्य नोंदणीसाठी ५ मार्चपर्यंत पुढील ठिकाणी नावे नोंदवावी.

डॉ. बाळू पाटील,श्रद्धा नगर, पुरुषोत्तम मेडिकल,जामनेर रोड, मामा पाचपांडे पान सेंटर, पांडुरंग टॉकीज समोर, भोरगाव लेवा पंचायत ऑफिस मल्हार हॉटेल शेजारी, जामनेर रोड येथे नोंदणी करावी, असे आव्हान भुसावळ विभागाच्या उपक्रम चेअरमन आरती सारंग चौधरी व मंगला भीमराव पाटील यांनी केले आहे.


Protected Content

Play sound