भुसावळ येथे ‘गुगल पे’ द्वारे २५ हजारांची फसवणूक

crime 2

भुसावळ, प्रतिनिधी । येथील चाळीस बंगला कॉटर नंबर डी. ३२२ सी.बी.रोड भुसावळ मधील रहिवाशी यांची ओएलएक्स अॅप्लीकेशनवरून स्कुटी मोटर सायकल घेण्यासाठी फिर्यादीचा मुलीच्या मोबाईल वरून २५ हजारात फसवणूक केल्याची घटना दुपारी घडली.

ओएलएक्स अॅप्लीकेशनवरून स्कुटी मोटर सायकल घेण्यासाठी फिर्यादी विनोद कुमार हनुमान शरण समाधिया (वय ५५ नोकरी) करीत असून चाळीस बंगला कॉटर नंबर डी. ३२२ सी. बी. रोड भुसावळ मधील रहिवाशी आहे. फिर्यादीची मुलीच्या मोबाईलवरून आरोपी श्रीमांक कुमार (पूर्ण नाव माहीत नाही) राहणार बालाजी मेडिकल घर नंबर ८३,वार्ड क्रमांक ८ अटारी लोका मधूबन बिहार,राजकुमार कैलास (पूर्ण नाव माहीत नाही),राजेश कुमार (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी संगमताने “गुगल पे” व्दारे शुक्रवार दि. २१ रोजी १०.०९ ते शनिवार रोजी दुपारी ३.२० वाजेच्या दरम्यान २५ हजार रुपयात फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोना सुनील सैदांणे करीत आहे.

Protected Content