श्रीनगर । जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात भारतीय जवानांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये लष्कर-ए-तोयबा संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
जम्मू-काश्मिरातल्या बिजबेहरा भागात आज सकाळी सुरक्षा दलाने केलेल्या एन्काऊन्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. हे दहशतवादी लष्कर ए तोयबाचे सदस्य असल्याचं सांगण्यात येतंय. या चकमकीत सुरक्षादलानं दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. सर्च ऑपरेशन सुरू असताना संगम भागात दहशतवादी लपून बसल्याची सूचना त्यांना मिळाली होती. यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला. प्रत्यूत्तरादाखल सुरक्षादलानंही त्यांच्यावर गोळीबार केला. या चकमकीत लष्करचे दोन दहशतवादी मारले गेले.