Home Agri Trends अमरावती जिल्ह्यात पोकरा योजनेची पाहणी

अमरावती जिल्ह्यात पोकरा योजनेची पाहणी

0
34

sheti pahani

अमरावती प्रतिनिधी । जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थात पोकरा योजनेच्या कार्यान्वयनाची पाहणी करून प्रमुख मृदा विशेषज्ञ भाऊसाहेब बर्‍हाटे यांनी केली.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे (पोकरा) प्रमुख मृदा विशेषज्ञ भाऊसाहेब बर्‍हाटे हे सध्या राज्याच्या विविध भागांमध्ये जाऊन योजनेच्या कार्यान्वयनाची पाहणी करून सध्या सुरू असणार्‍या कामांबाबत मार्गदर्शन करत आहेत. ते विविध गावांच्या शिवारांमध्ये जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधत आहेत. जळगाव जिल्ह्यात तीन दिवस पाहणी केल्यानंतर त्यांनी अमरावती जिल्ह्यात पाहणी केली आहे. या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातील विश्‍नोरा गावात त्यांनी आज पाहणी केली. यात त्यांनी शेतकर्‍यांना काही मुद्यांवरून मार्गदर्शन देखील केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत कृषी खात्याचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound