औरंगाबाद (वृत्तसंस्था) वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर औरंगाबाद, सोलापूर आणि बीडमध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आले. यावेळी वारिस पठाणा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांची अंतयात्रा काढण्यात आली. तसेच त्यांच्या प्रतिमेला काळे देखील फासण्यात आले.
सोलापुरात आमदार वारिस पठाण यांच्या प्रतिमेला काळे फासून आंदोलन, प्रहार संघटनेच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आमदार वारीस पठाण यांनी चिथावणीखोर वक्तव्य करुन हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दुसरीकडे बीड भाजपच्या वतीने वारिस पठाणच्या प्रतिमेस जोड़े मरून आणि प्रतिमेच दहन करून निषेध व्यक्त केला आहे. तर औरंगाबादमध्ये भाजपनेही आंदोलन केले. यावेळी वारिस पठाण आणि एमआयएम विरोधात घोषणाबाजी करीत वारिस पठाण यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तर पुतळा ही जाळण्यात आला. वारीस पठाण याची या देशातून हकालपट्टी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.