एरंडोल येथे जयबाबाजी भक्त परिवारातर्फे भाविकांना फराळाचे वाटप

129

एरंडोल, प्रतिनिधी । येथे आज शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जयबाबाजी भक्त परिवारातर्फे महाशिवरात्री निमित्ताने सुमारे ७ हजार भाविकांना साबुदाणा खिचडी,केळी व दुध असा फराळ वाटप करण्यात येणार आहे.  यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रम स्थळाला भेट देऊन फराळाचा आस्वाद घेतला व कार्यकर्त्यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

सकाळी सहा वाजता पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या हस्ते जनार्दन स्वामी,१००८ महामंडलेश्वर श्री शांतिगिरी महाराज यांच्या प्रतीमाची व शिव प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी,नगरसेवक ऍड.नितीन महाजन आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किरण बोरसे,पंकज महाजन,भरत महाजन,पिंटू महाजन,काशिनाथ महाजन, डॉ. प्रशांत पाटील, अजय पाटील, दादा महाजन, सोनु ठाकुर, सचिन महाजन, संजु महाजन, बाबा फुले, दादा पाटील, किरण महाजन व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमा अंतर्गत सुमारे साडेतीन क्विंटल साबुदाणा, २०० लिटर दुध व ५० कॅरेट केळी वितरीत करण्यात येणार आहे.

Protected Content