सोलापुरात बस आणि जीपचा भीषण अपघात ; पाच जण जागीच ठार

accident

 

सोलापुर (वृत्तसंस्था) सोलापुरजवळील राळेरास येथे झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर दहा जण जखमी झाले असून यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बार्शीकडून सोलापूरकडे निघालेल्या एसटी बसने राळेरासमध्ये एका जीपला जोरदार धडक दिली. यात ५ जण जागीच ठार झालेत. अपघात इतका भयंकर झाला की, जीपचा पुढील भाग पुर्णपणे चक्काचूर झाला.

Protected Content