मराठा महासंघातर्फे आश्रमशाळेत शालेय साहीत्य वाटप

bhadgaon 1

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील, वाक येथे शासकिय बालवस्तीगृह येथे अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे विद्यार्थ्यानां शालेय साहीत्य वाटप करण्यात आले. अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणुन भडगांव नगरपालिकेचे नगरसेविका योजनाताई पाटील, मुख्याध्यापक डी.डी. पाटील, वाकचे सरपंच कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते स्वप्नील पाटील, पत्रकार भानुदास महाजन, निलेश पाटीलसर, वडजी येथील नाना पाटील, देविदास अमृतकर, वस्तीगृह अधिक्षक आर.पी. पाटील, जी.के. जाधव, जी.बी. पाटील, ए.बी. अहिरराव, व्ही.एस. पाटील, एस.पी. काळे, पिजारी मँडम, आर.एम. गायकवाड, भावेश पिजारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा प्रमुख डाँ बी. बी. भोसले यांनी केले होते.

Protected Content