Home धर्म-समाज भुसावळ रिपाइंतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

भुसावळ रिपाइंतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन


bbhusawal news

भुसावळ प्रतिनिधी । येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

भुसावळ येथील टिंबर मार्केट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश मकासरे यांच्याहस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी पक्षाचे खान्‍देश प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण जाधव, युवा नेते पप्पू सुरडकर, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास खरात, जिल्हा सचिव प्रकाश सोनवणे, तालुका उपाध्यक्ष कैलास जामकर, शांताराम देशमुख, गोरख सुरवाडे, आकाश ढेरे, प्रकाश तायडे, सुधीर दांडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound